शिक्षणातून सशक्तीकरण: महिलांसाठी अबॅकस ट्रेनिंगचे महत्त्व
शिक्षणातून सशक्तीकरण: महिलांसाठी अबॅकस ट्रेनिंगचे महत्त्व आजच्या आधुनिक युगात महिलांचे सशक्तीकरण ही केवळ गरज नसून समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रिया आत्मनिर्भर बनतात आणि आपल्या कुटुंबासोबत समाजालाही दिशा देतात. अशाच प्रभावी शिक्षणपद्धतींपैकी एक म्हणजे अबॅकस टिचर ट्रेनिंग, जी महिलांना नवीन संधी देत आहे. मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये, महिलांसाठी अबॅकस ट्रेनिंग किती महत्त्वाची आहे याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. १. अबॅकस ट्रेनिंग म्हणजे काय? अबॅकस म्हणजे गणित शिकण्याची एक प्राचीन आणि प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे मानसिक गणिताची क्षमता प्रचंड वाढते. या प्रशिक्षणाद्वारे मेंदूचा विकास, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तर्कशक्ती सुधारते. विशेष म्हणजे, महिलांसाठी हे एक कौशल्याधारित प्रशिक्षण आहे जे त्यांना करिअरची नवीन दिशा दे...