Skill-based Learning – खरंच गरजेचं आहे का?
आजचं जग अतिशय वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञान, स्पर्धा आणि अपेक्षा यामुळे शिक्षणाची दिशा देखील बदलत आहे. पूर्वी केवळ पुस्तकातील ज्ञान आणि परीक्षेतील गुण यांनाच यशाचं मापदंड मानलं जात होतं. मात्र आजच्या काळात हे अपुरं ठरत आहे. कारण वास्तव जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ अभ्यास नव्हे, तर विविध कौशल्यांची गरज भासते. म्हणूनच आज Skill-based Learning म्हणजेच कौशल्याधारित शिक्षणाकडे लक्ष देणं अत्यावश्यक बनलं आहे. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये, Skill-based Learning – खरंच गरजेचं आहे का? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. सर्वात आधी जाणून घेवुया की Skill -based Learning म्हणजे नेमकं काय? Skill-based Learning म्हणजे अशी शिक्षणपद्धती जिथे मुलं फक्त माहिती पाठ करत नाहीत, तर ती माहिती प्रत्यक्षात कशी वापरायची हे शिकतात. विचार करण्याची क्षमता, समस्या...