आजच्या मुलांमधील चिडचिड, राग आणि एकटेपणा वाढण्याची कारणे व उपाय
आजच्या काळात अनेक पालक एक गोष्ट आवर्जून सांगतात की त्यांची मुलं लवकर चिडचिड करतात, छोट्या-छोट्या कारणांवर रागावतात किंवा हळूहळू एकटेपणाकडे झुकत आहेत. ही समस्या एखाद्या घरापुरती मर्यादित नसून ती आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आहे. आधुनिक तंत्रज्ञान, वाढलेली स्पर्धा, बदललेले कुटुंबीय नातेसंबंध आणि पालक-मुलांमधील संवादाचा अभाव यामुळे मुलांच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होत आहे.
नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.
तर या ब्लॉगमध्ये, आजच्या मुलांमधील चिडचिड, राग आणि एकटेपणा वाढण्याची कारणे व उपाय याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.
तर सर्वात आधी जाणून घेऊयात मुलांमधील चिडचिड, राग आणि एकटेपणाची कारणे..
१. स्क्रीनच्या जगात हरवत चाललेला प्रत्यक्ष संवाद
आजची मुलं लहान वयापासून मोबाईल, टॅबलेट, टीव्ही आणि ऑनलाइन गेम्सच्या संपर्कात येत आहेत. यामुळे त्यांचा बराचसा वेळ स्क्रीनसमोर जातो आणि प्रत्यक्ष संवाद, मैदानी खेळ व माणसांमधील भावनिक जोड कमी होत जाते. स्क्रीनमुळे मुलं क्षणभर शांत दिसतात, पण हळूहळू त्यांना एकटेपणाची सवय लागते आणि भावना व्यक्त करण्याची क्षमता कमी होते. परिणामी, त्यांच्या मनात साठलेली अस्वस्थता राग किंवा चिडचिडीच्या रूपात बाहेर पडते.
२. वाढत्या अपेक्षा आणि मुलांच्या मनावरचा दबाव
३. वेळेचा अभाव आणि दुर्लक्षित भावना
अनेक वेळा पालक मुलांवर प्रेम करत असले तरी त्यांच्याकडे मुलांसाठी पुरेसा वेळ नसतो. कामाचा ताण, घरगुती जबाबदाऱ्या आणि दैनंदिन धावपळीत मुलांच्या भावना ऐकून घेण्याकडे दुर्लक्ष होते. जेव्हा मुलं बोलायला येतात आणि त्यांना वारंवार “नंतर बोलू”, “आत्ता वेळ नाही” अशी उत्तरं मिळतात, तेव्हा त्यांना आपलं म्हणणं महत्त्वाचं नाही असं वाटायला लागतं. हळूहळू मुलं मनातल्या भावना स्वतःपुरत्या ठेवतात आणि एकटेपणाची भावना वाढते.
४. भावना दडपण्याची सवय आणि त्याचे परिणाम
आजच्या पिढीत संवादापेक्षा सूचना जास्त दिल्या जातात. मुलांना काय करू नये हे सांगितलं जातं, पण कसं वाटतंय हे विचारलं जात नाही. राग करू नको, रडू नको, गप्प बस अशा वाक्यांमुळे मुलं भावना दाबून ठेवायला शिकतात. मात्र या दडपलेल्या भावना कधी ना कधी बाहेर येतातच आणि त्या वेळी त्यांचं स्वरूप अधिक तीव्र असतं.
आता यावर उपाय काय? तर,
१. समजून घेणारा पालक – पहिला उपाय
या सगळ्या परिस्थितीत पालकांनी थोडा थांबून स्वतःकडे आणि मुलांकडे पाहणं गरजेचं आहे. दररोज थोडा वेळ फक्त मुलांसाठी राखून ठेवणं, मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्याशी मनापासून बोलणं, त्यांच्या छोट्या-मोठ्या गोष्टी ऐकून घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. मुलं रागावली असताना त्यांना ओरडण्याऐवजी त्यांच्या रागामागचं कारण समजून घेतलं, तर त्यांना सुरक्षिततेची भावना मिळते.
२. तुलना थांबवून आत्मविश्वास वाढवणं
तुलना टाळणं, प्रत्येक मूल वेगळं आहे हे स्वीकारणं आणि त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. घरातलं वातावरण भावनिकदृष्ट्या सुरक्षित असेल, तर मुलं मनमोकळेपणाने भावना व्यक्त करू शकतात. खेळ, वाचन, चित्रकला किंवा साध्या घरगुती कामांतून मुलांसोबत वेळ घालवल्यास पालक-मुलांमधील नातं अधिक घट्ट होतं आणि एकटेपणाची भावना कमी होते.
३. मुलं वाईट नाहीत, ती फक्त समजून घ्यायची आहेत
कारण, आजची मुलं वाईट किंवा हट्टी नाहीत, तर त्यांना समजून घेण्याची गरज आहे. त्यांना जास्त उपदेश नको असतो, तर ऐकून घेणारा आणि समजून घेणारा पालक हवा असतो. जर आपण त्यांच्या भावना ओळखल्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन दिलं, तर हीच मुलं उद्या आत्मविश्वासाने आणि आनंदाने जीवनाला सामोरी जातील.
एक पालक म्हणून आपल्याला लक्षात ठेवायला हव की मुलांचा राग हि समस्या नाही तर तो त्यांच्या न बोललेल्या भावनांचा आवाज आहे. म्हणून मुलांच म्हणणं ऐका कारण प्रत्येक मूल ऐकले जाण्याची वाट पाहत असतं.
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि मुलांच्या मेंदू विकासासंदर्भात अधिक माहितीसाठी Brain Booster या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ
संपर्क : 8652381880








👏🙌👌
ReplyDeleteKhup mst blog lihla aahe nakki hyacha baryach palkana fayda hoil
ReplyDeleteखुपचं छान
ReplyDelete