Overthinking कसं थांबवायचं? महिलांसाठी 7 सोप्या आणि प्रभावी सवयी
Overthinking कसं थांबवायचं? महिलांसाठी ७ सोप्या आणि प्रभावी सवयी आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिलांना एक common problem जाणवतो तो म्हणजे Overthinking (जास्त विचार करणं). छोट्या-छोट्या गोष्टींचा सतत विचार करत राहणं, “मी बरोबर केलं का?”, “लोक काय म्हणतील?”, “उद्या काय होईल?” अशा प्रश्नांमध्ये मन अडकून राहतं. अशा प्रकारे सतत विचार करत राहिल्यामुळे मानसिक थकवा येतो, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि आत्मविश्वासावरही परिणाम होतो. काही वेळा तर Overthinking मुळे आपण ज्या गोष्टी करू शकतो त्या देखील टाळतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा Overthinking ही कायमची समस्या नाही, ती एक सवय आहे आणि योग्य सवयी लावून ती बदलता येते. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये पाहूया त्या ७ सोप्या आणि प्रभावी सवयी ज्या तुम्हाला Overthinking पासून दूर ठेवतील १. वर्तमानात जगायला शिका (Live in the Present) Overthinking चं सर्वात मोठं कारण म्हणजे ...