प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो – त्यांच्यात तुलना करणे का चुकीची आहे?
प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो – त्यांच्यात तुलना करणे का चुकीची आहे? आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अनेक अपेक्षांचा भार असतो. पालक, शिक्षक आणि समाजाकडून सतत “इतर मुलांप्रमाणे यशस्वी व्हा” असा दबाव दिला जातो. पण आपण एक गोष्ट विसरतो — प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, शिकण्याची गती, आवडीनिवडी आणि कौशल्ये वेगवेगळी असतात. त्यामुळे एका विद्यार्थ्याची दुसऱ्याशी तुलना करणे योग्य नाही. तुलना केल्याने मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्या आत्मविश्वासावरही त्याचा परिणाम होतो. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये, प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो आणि त्यांच्यात तुलना करणे का चुकीची आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. १. तुलना विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करते. जेव्हा एखाद्या विद्यार्थ्...