आई एकाच वेळी पालक आणि मार्गदर्शक कशी बनू शकते?


आजची स्त्री फक्त घर सांभाळणारी आई राहिलेली नाही, तर ती समाज घडवणारी मार्गदर्शक बनत आहे. काळ बदलतो आहे, शिक्षणाची व्याप्ती वाढते आहे आणि त्यासोबत महिलांची भूमिका अधिक सक्षम, अधिक प्रभावी होत चालली आहे. पूर्वी आई म्हणजे केवळ मुलांची काळजी घेणारी, त्यांच्या गरजा पूर्ण करणारी व्यक्ती अशी ओळख होती. पण आजची आई मुलांच्या शिक्षणातील पहिली शिक्षिका, त्यांच्या स्वप्नांची पहिली प्रेरणा आणि यशाची खरी शिल्पकार आहे.

नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System  ची Abacus Master Trainer, Brain Booster या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० शिक्षकांना अॅबॅकसची ट्रेनिंग देऊन १,००,००० विद्यार्थ्यांच्या मेंदू विकासात व आयुष्यात योगदान करायचे आहे.

तर या ब्लॉगमध्ये, आई एक मार्गदर्शक कशी बनू शकते? आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिलांची नवी भूमिका याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा.


शिक्षणातून नेतृत्वाकडे



आज अनेक महिला शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला नव्या ओळखी देत आहेत. अबॅकस, मेंटल मॅथ्स, व्यक्तिमत्त्व विकास, मार्गदर्शन प्रशिक्षण अशा क्षेत्रांत महिलांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. घरातूनच व्यवसाय उभा करून त्या इतर मुलांच्या आयुष्यालाही योग्य दिशा देत आहेत.


स्वावलंबनाची नवी व्याख्या

स्वतः सक्षम होणं म्हणजे केवळ आर्थिक स्वावलंबन नाही, तर आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि नेतृत्व यांची जाणीव होणं आहे. आजची स्त्री स्वतः शिकते, इतरांना शिकवते आणि मुलांच्या भविष्यासाठी ठोस पावलं उचलते.


आई + मार्गदर्शक = उज्ज्वल भविष्य



जेव्हा आई शिक्षिका, प्रशिक्षक किंवा मार्गदर्शक बनते, तेव्हा तिचं मूल केवळ अभ्यासातच नाही तर जीवनातही पुढे जातं. अशा मातांकडून मुलांना शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक विचार आणि यशाकडे वाटचाल करण्याची दृष्टी मिळते.


नव्या युगातील स्त्री

आजची स्त्री ही बदल घडवणारी शक्ती आहे. ती घर आणि करिअर यांचा सुंदर समतोल साधत, स्वतःचा आत्मसन्मान जपत समाजासाठी आदर्श निर्माण करते. तिचा हा प्रवास अनेक महिलांना प्रेरणा देणारा ठरतो. आई ते मार्गदर्शक हा प्रवास केवळ एका स्त्रीचा नसून, संपूर्ण पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठीचा आहे. आजची सक्षम, शिक्षित आणि आत्मविश्वासू महिला म्हणजे उद्याच्या यशस्वी पिढीची मजबूत पायाभरणी आहे.


तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि तुम्हाला जात शिक्षण क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर Versatile शिक्षण सखी या व्हॉट्स ॲप ग्रुपला जॉईन करा.


धन्यवाद!!

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आजच्या मुलांमधील चिडचिड, राग आणि एकटेपणा वाढण्याची कारणे व उपाय

Skill-based Learning – खरंच गरजेचं आहे का?