महिलांनी Career Break नंतर पुन्हा सुरुवात कशी करावी?
महिलांनी Career Break नंतर पुन्हा सुरुवात कशी करावी? काही दिवसांपूर्वी मी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पाहिली की अनेक महिला लग्नानंतर किंवा त्यांच्या मुलांनंतर काम आणि करियर सोडून घरी रहावं लागत आहे म्हणून त्यांना अनेक गोष्टी ऐकव्या लागत आहेत तर काहींना अनेक गोष्टींना सामोरे जाव लागत आहेत म्हणून महिलांनो वाईट वाटून घेऊ नका असं त्या व्हिडिओत एक महिला संदेश देत होती आणि तेव्हा मला वाटलं की मी अश्या महिलांसाठी ब्लॉग लिहावा ज्या सध्या काही कारणांमुळे घरी आहेत. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर सखींनो तुमचा थांबलेला प्रवास संपला नाही तर आता नव्या आत्मविश्वासाने पुन्हा उंच भरारी कशी घ्यायची हे जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा हा ब्लॉग.. अनेक महिलांच्या आयुष्यात असा एक काळ येतो, जेव्हा त्यांना करिअरला काही काळासाठी विराम द्यावा लागतो. लग्न, मातृत्व, कुटुंबाची जबाबदारी, आरोग्याच्या समस्या किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे हा ब्रेक घ्यावा लागतो. ...