व्यस्त गृहिणींसाठी दिवसाचे स्मार्ट प्लॅनिंग
व्यस्त गृहिणींसाठी दिवसाचे स्मार्ट प्लॅनिंग घरातील महिलांवर अनेक जबाबदाऱ्या असतात – स्वयंपाक, मुलांची काळजी, घरकाम आणि कुटुंबाची सेवा. या सगळ्यात वेळ कधी निघून जातो हे कळतही नाही. योग्य वेळ व्यवस्थापन केल्यास कामं वेळेत पूर्ण होतात आणि स्वतःसाठीही वेळ मिळतो. त्यामुळे आयुष्य अधिक संतुलित आणि आनंदी होतं. नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Master Trainer , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे. तर या ब्लॉगमध्ये, महिलांसाठी वेळ व्यवस्थापन करणे का गरजेचे आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा. १. दिवसाची सुरुवात प्लॅनिंगने करा सर्वात आधी तर तुम्ही सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्यापूर्वी पुढील दिवसाचा साधा प्लॅन तयार करा. कोणती कामं आधी करायची, कोणती नंतर – हे ठरवलं तर गोंधळ कमी होतो आणि कामं जलद पूर्ण होतात. २. प्राधान्यक्रम ठरवण्याची सवय लावा सर्व कामं एकाच वेळी करणं शक्य नसतं. त्यामुळे महत्त्वाची कामं आधी पूर्ण करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, मुलांच्या गरजा आणि जेवण बनवणं ही कामं...