महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे ११ Secrets (स्वतःवर विश्वास ठेवण्याची सुरुवात इथूनच!)
महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे ११ Secrets (स्वतःवर विश्वास ठेवण्याची सुरुवात इथूनच!)
नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director, Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे.
खरं तर आत्मविश्वास हा जन्मतः येत नाही, तो आपण स्वतः तयार करतो. आपल्या विचारांमधून, सवयींमधून आणि कृतीतून तो हळूहळू वाढतो. आणि एकदा का आत्मविश्वास वाढला, की जीवनातील अनेक अडचणी सहज पार करता येतात.
तर या ब्लॉगमध्ये आपण महिलांसाठी आत्मविश्वास वाढवण्याचे काही प्रभावी आणि सोपे Secrets जाणून घेणार आहोत, जे तुम्हाला तुमचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि यशस्वी बनवायला मदत करतील. त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
१. स्वतःला ओळखा – तुमची खरी ताकद शोधा
👉 रोज 5 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि लिहा – “माझे 5 चांगले गुण” यामुळे तुम्हाला तुमची value समजायला लागेल आणि आत्मविश्वास वाढेल.
२ .Positive Self-Talk ची सवय लावा
👉 “मी नाही करू शकत” → “मी नक्की प्रयत्न करेन”
👉 “माझ्याकडून होत नाही” → “मी शिकत आहे”
दररोज स्वतःला positive affirmations द्या:
✔️ “मी सक्षम आहे”
✔️ “मी माझं आयुष्य बदलू शकते”
३. छोट्या यशांचा आनंद घ्या
👉 आज तुम्ही एखादं नवीन काम केलं?
👉 काहीतरी नवीन शिकलात?
हे सगळं तुमचं यश आहे. त्याचा अभिमान बाळगा.
४. स्वतःची तुलना टाळा
तुलना ही आत्मविश्वासाची सर्वात मोठी शत्रू आहे. सोशल मीडियावर इतरांचं जीवन पाहून आपण स्वतःला कमी समजतो, पण प्रत्येकाची journey वेगळी असते.
👉 “ती काय करते” याऐवजी “मी काय करू शकते” यावर लक्ष द्या.
👉 स्वतःशीच स्पर्धा करा—कालपेक्षा आज चांगलं व्हा.
५. नवीन गोष्टी शिकत राहा
👉 Communication skills
👉 Online earning skills
👉 Cooking, designing, teaching
नवीन शिकणं तुम्हाला self-dependent बनवतं.
६. स्वतःसाठी वेळ काढा (Me-Time)
महिला अनेकदा सगळ्यांसाठी वेळ काढतात, पण स्वतःसाठी नाही. पण लक्षात ठेवा—तुम्ही स्वतः मजबूत असाल, तरच तुम्ही इतरांना सांभाळू शकता.
👉 रोज 15-30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा
👉 Meditation, reading, walking करा
यामुळे मन शांत राहतं आणि clarity येते.
७. भीतीवर मात करा (Face Your Fear)
भीती ही नैसर्गिक आहे, पण त्यापासून पळणं चुकीचं आहे. भीतीला सामोरं गेल्यावरच आत्मविश्वास वाढतो.
👉 Public speaking ची भीती? – छोट्या ग्रुपमध्ये बोलायला सुरुवात करा
👉 नवीन कामाची भीती? – छोटे steps घ्या
“Fear is temporary, but confidence is permanent!”
८. Positive लोकांमध्ये रहा
👉 Negative लोकांपासून थोडं दूर राहा 👉 Supportive आणि प्रेरणादायी लोकांमध्ये रहा
अशा लोकांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.
९. स्वतःवर प्रेम करा
Self-love हा confidence चा base आहे. तुम्ही जशा आहात तशा स्वतःला स्वीकारा.
👉 तुमचं appearance
👉 तुमची personality
👉 तुमच्या चुका
हे सगळं तुमचं uniqueness आहे.
१०. Action घ्या – फक्त विचार करू नका
👉 छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा 👉 रोज एक productive काम करा
“Start small, but never stop!” 🚀
११. स्वतःला बक्षीस द्या
👉 आवडतं खाणं
👉 छोटा outing
👉 काहीतरी special स्वतःसाठी
यामुळे तुमचं मोटीवेशन वाढतं.
आत्मविश्वास हा एका दिवसात येत नाही, तो रोजच्या छोट्या-छोट्या सवयींमधून तयार होतो. स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य ठेवा आणि स्वतःची किंमत ओळखा. “तुम्ही जे समजता त्यापेक्षा खूप जास्त मजबूत आणि सक्षम आहात.” आजच सुरुवात करा… कारण तुमचा आत्मविश्वासच तुमच्या यशाची खरी किल्ली आहे!
तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर jaya.sakpal8@gmail.com यावर mail करून विचारू शकता. आणि जर तुम्हाला स्वतःच अस्तित्व निर्माण करायचे असेल तर Versatile शिक्षण सखी या व्हॉट्स ॲप कम्युनिटीला जॉईन करा.
धन्यवाद!!
जया सकपाळ
संपर्क:- 8652381880
Website - https://versatileeducaare.com/abacus-teachers-training/












Khupach useful ahe ha lekh
ReplyDeleteThank u mam 🙂
Khupch chaan ahe
ReplyDelete