Posts

Showing posts from September, 2026

“लोक काय म्हणतील?” – समाजाच्या भीतीतून स्वतःला मुक्त कसं करावं?

Image
“लोक काय म्हणतील?” – समाजाच्या भीतीतून स्वतःला मुक्त कसं करावं? “लोक काय म्हणतील?” हे चार शब्द अनेक महिलांच्या आयुष्यातील मोठ्या निर्णयांना थांबवतात. नवीन नोकरी स्वीकारायची असो, व्यवसाय सुरू करायचा असो, करिअरमध्ये बदल करायचा असो, स्वतःसाठी काही नवीन शिकायचं असो किंवा आयुष्यात एखादी वेगळी वाट निवडायची असो, आपल्या मनात पहिला विचार येतो तो अनेकदा “लोक काय म्हणतील?” हा असतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, हे “लोक” नेमके कोण आहेत, हे आपल्यालाही माहीत नसते. तरीही त्यांच्या मतांचा विचार करत आपण स्वतःच्या इच्छा, स्वप्नं आणि निर्णय मागे ठेवतो.  नमस्कार, मी जया सकपाळ Versatile Educaare System ची Abacus Program Director , Versatile शिक्षण सखी या कम्युनिटीची फॉउंडर आणि मला १००० महिलांच्या आयुष्यात योगदान करायचे आहे.  तर या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की “लोक काय म्हणतील?” या समाजाच्या भीतीतून स्वतःला मुक्त कसं करावं? याचे उपाय त्यासाठी हा ब्लॉग शेवट पर्यंत नक्की वाचा  १. समाजाची भीती की स्वतःच्या विचारांची मर्यादा? समाज काय म्हणेल याची भीती अनेकदा बाहेरच्या लोकांपेक्षा आपल्या मनातच ज...